Click here >>   English                        

नेत्रदान : कार्य महान | नेत्रदान : सर्वश्रेष्ठ दान | करुनी नेत्रदान, वाढवा मानव जातीची शान | जीवन का अमूल्य वरदान, नेत्रहिन को नेत्रदान | ज्याला अंध व्यक्तीची जान, तोच करतो नेत्रदान | नेत्रदान का संकल्प करे, मृत्यू के बाद मृत्युंजय बने | स्वतः नेत्रदानाचा संकल्प करा, दुसऱ्यांना प्रेरित करा | मरावे परि, नेत्ररूपी उरावे | अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावे, तुमच्या डोळ्यातून कोणीतरी जग पाहावे | आपकी आंखे दुनिया देखे, आपके साथ भी, आपके बाद भी | नेत्रदान करा आणि करवून घ्या | जर मृत्युनंतरही हे सुंदर जग पहायचे असेल तर नेत्रदान करा |
 


     
 

                             ‘गाव करील ते राव काय करील’ ही कागदावर शोभून दिसणारी म्हण प्रत्यक्षात आणावयाची म्हणजे अनंत अडचणींचा डोंगर. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील “अत्याळ” (ता. गडहिंग्लज) गावातील ग्रामस्थांनी आपल्यातील ऐक्याच्या जोरावर ही म्हण सार्थ ठरविली आहे. पुरोगामीत्वाचा झेंडा मिरविणाऱ्या या राज्यातील समाज अवयव दानाच्या मानसिकतेपासून अद्याप कोसो दूर आहे. अशा परिस्थितीत अत्याळकरांनी पेटविलेली मरणोत्तर नेत्रदान चळवळीची ज्योत अधिक प्रकाशमय वाटते. चळवळीचे काम एका गावापुरते मर्यादित न राहता त्याचा परिघ विस्तारत आहे. एक–एक गाव या चळवळीशी जोडले जात आहे. साडेतीन वर्षामध्ये तब्बल २३ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. या माध्यमातून अंधांना दृष्टी देण्याचे काम सुरू आहेच. पण, समाजालाही नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 
     
 

-: या तत्वांवर उभारली चळवळ :-

१. नेत्रदान चळवळीसाठी कोणतीही समिती नाही. गावातील प्रत्येक नागरिक या चळवळीचा कार्यकर्ता आहे. देशात अद्याप समान नागरी कायदा आला नसला तरी चळवळीमध्ये समान कार्यकर्ता कायद्याची अंमलबजावणी झाली आहे.    
         
  २. कोणतीही चळवळ पैशापेक्षा कार्यकर्त्यांवर उभी राहते. त्यामुळे पैशाला गौण स्थान दिले आहे. नेत्रदान चळवळीत झिरो बॅलेन्सचे सूत्र अवलंबले आहे.    
         
  ३. राजकीय गट-तट, आपापसातील वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून सारे गाव चळवळीच्या व्यासपीठावर एकत्र आले आहे. पुढील टप्पा म्हणून अशी अनेक गावे एका धाग्यामध्ये गुंफली जात आहेत.    
         
  ४. सामाजिक काम म्हटले की हार, सत्कार, पुरस्कार आलाच. पण चळवळीमध्ये नेमका याच गोष्टीला फाटा दिला आहे. इथे गौरव होतो तो फक्त नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचा.    

                 
 
संपर्कात राहा -
       संपर्क
 
       
डॉ. सदानंद पाटणे
 
 
+९१ ९८ २२० ६८७३८
 
       
श्री. अवधूत पाटील
 
 
 
+९१ ८८० ५०१ ५५६५
 
       
श्री. सुधाकर घोरपडे
 
 
प्रेक्षक - 
+९१ ७८७५ १४ ९७२७
 
 
सर्व हक्क राखीव © २०१६ | Designed by: पवन येजरे , महंतेश गुरव